रावेर बाजार समिती निवडणूक : महाविकास आघाडीला बहुमत मिळेल माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा दावा
रावेर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे.
रावेर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. १५ वर्षात प्रथमच तीन स्वतंत्र पॅनल मध्ये हि निवडणूक होत आहे. महाविकास आघाडी, भाजप शिंदे गट व जनशक्ती प्रहार पक्ष असे तीन पॅनल निवडणूक मैदानात उतरले आहेत. महाविकास आघाडीची परिस्थिती भक्कम असून या पॅनलला बहुमत मिळेल असा दावा माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केला. तालुक्यातील रोझोदा येथील कामसिद्ध मंदिरात झालेल्या मेळाव्यात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर आमदार शिरीष चौधरी, माही आमदार अरुण पाटील, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील, मोहन पाटील, सोपान पाटील, प्रल्हाद बोन्डे , विजय महाजन, रामचंद्र महाजन, मनीषा पाटील, शारदा पाटील, प्रवीण पंडित, महेमूद शेख उपस्थित होते.
आमदार खडसे पुढे म्हणाले कि, केंद्र व राज्य सरकारचे धोरण शेतकऱ्या विरुद्ध आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजार समितीच्या माध्यमातून अधिक भाव मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीच्या विचारधारेची माणसे तिथे गेली पाहिजे. यासाठी या पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी कारण्याचेहि आवाहन खडसे यांनी यावेळी केले. आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, राजीव पाटील यांनी यावेळी मानिगत व्यक्त केले, सुत्रसंचलन आर के चौधरी यांनी केले. मेळाव्याला सर्व उमेदवार, परिसरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.